Breaking News

पंचायत समितीच्या सेस फंडातून दिव्यांग बांधवांना दुचाकींचे वाटप

Distribution of two-wheelers to the disabled from the Panchayat Samiti's Cess Fund

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ : पंचायत समिती, फलटणच्या सेस फंडातून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दुचाकी मोटरसायकलींचे वाटप करण्यात आले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला.

    सभापती शिवांजली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

    दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनातील प्रवासासाठी अधिक स्वावलंबी होण्यास मदत व्हावी, तसेच शिक्षण, रोजगार आणि इतर कामांसाठी ये-जा करणे सुलभ व्हावे, या उद्देशाने दुचाकींचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या सेस फंडातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाभार्थी दिव्यांग बांधवांना मोठा आधार मिळाला.

No comments