Breaking News

कोळकीत आजी-माजी सैनिक संघटनेत स्वातंत्र्य दिन उत्साहात; सार्जंट किसन शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण

Independence Day celebrated in Kolkit's Aji-Ex-Saikin Sangha; Flag hoisted by Sergeant Kisan Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आजी-माजी सैनिक संघटनेच्या कोळकी, फलटण येथील कार्यालयात माजी सैनिक सार्जंट किसन शिंदे व सौ. शिंदे ताई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, पंचायत समिती सदस्य विकास नाळे, माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, माजी सरपंच सौ. रेशमा देशमुख, माजी सरपंच विक्रम पखाले, संजय देशमुख, दिलीप लोंढे काका,  मकरंद पखाले, रणजीत काशीद, बनकर अण्णा, प्रदीप भरती, भोसले सर, राजीव खिलारे, बळीप आप्पा, यांच्यासह विविध मान्यवर, आजी-माजी सैनिक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी जयकुमार शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

    कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र खिलारे, उपाध्यक्ष संजय गावडे, खजिनदार बाळासो शिंदे, नामदेव बनकर, राजेंद्र भोसले, वसंत गंगावणे, बाळासो शिंगाडे, तुकाराम ननवरे, सुभेदार अर्जुन बागाव, सुभेदार लक्ष्मण लोहार, नामदेव शेडगे, भीमराव जाधव, किशोर मिसाळ, बाळासो बागा, दत्तात्रय माने, किसन शिंदे, दिलीप भिसे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

    कार्यक्रमाच्या शेवटी माजी सैनिक किशोर मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments