Breaking News

श्रीमंत संजीवराजेंच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा प्रतिसाद ; फलटण आगाराला नवीन एसटी बसेसचे लोकार्पण

Transport Minister's response to Shrimant Sanjeev Raje's demand; New ST buses inaugurated at Phaltan depot

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ ऑगस्ट २०२६ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील बस स्थानक पाहणी दौऱ्यादरम्यान फलटण बस स्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली होती. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण बसस्थानकासाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी मंत्री महोदयांना केली होती. याप्रसंगी मंत्री सरनाईक यांनी ३१ ऑगस्टपूर्वी बस उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करत फलटण आगाराला नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आज १२ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण आगार येथे या बसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई कांबळे, पंचायत समिती सदस्य राहुल नरुटे, शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू नाना इवरे, विकास शिंदे, नगरसेवक विकास काकडे सर, पप्पू शेख, स्मिता शहा,कविता मदने,प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे, दीपक गायकवाड, फलटण आगार प्रमुख मुल्ला मॅडम,आगार व्यवस्थापक राहुल वाघमोडे, सुखदेव अहिवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत संजीवराजे यांच्या मागणीला प्रतिसाद देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने फलटण आगाराच्या सुविधांमध्ये भर पडली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने दिलेल्या शब्दाला किती महत्त्व दिले जाते, याचे हे उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

    दरम्यान, फलटण आगारासाठी आणखी काही बस उपलब्ध होणे बाकी असून, त्या देखील लवकरच उपलब्ध करून देण्याचा शब्द मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

    नवीन बस उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले. नवीन बसमुळे प्रवाशांना अधिक चांगली व नियमित एसटी सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

No comments