स्व. बकुळ पराडकर यांना रविवारी सामूहिक श्रद्धांजली; फलटण येथे शोकसभेचे आयोजन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २४ जुलै : स्वर्गीय बकुळ पराडकर यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि पत्रकार संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात होणार आहे.
अनुबंध कला मंडळ, फलटण पत्रकार संघ, फलटण ब्राह्मण संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), संस्कार भारती तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि स्व. बकुळ पराडकर यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शोकसभेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, माजी प्राचार्य देशमुख सर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे संचालक अरविंद निकम, डॉ. प्रसाद जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असून, स्व. बकुळ पराडकर यांचे चिरंजीवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
स्व. बकुळ पराडकर यांचे २० जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले होते. त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेस नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments