हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ; लाखोंचा मुद्देमाल नष्ट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ मे २०२६ - पोलीस अधिक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधिक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याबाबत कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत दिनांक ३०/०५/२०२६ रोजी मौजे सस्तेवाडी ता. फलटण जि. सातारा गावामध्ये काही इसम गावठी हातभट्टीची दारु गाळण्याच्या तयारीत आहेत अशी गोपनीय खात्रीशीर माहीती पो. नि. भुजबळ यांना मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे स.पो.नि सुबनावळ साो यांच्या पथकाने मौजे सस्तेवाडी ता. फलटण गावचे हद्दीत दोन ठीकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी १६००/- लिटर मुरवण, दोन लोखंडी कडई व जळण असे एकूण १,१६,०००/-रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून, आरोपी संजय श्याम पवार व अर्जुन श्याम पवार, दोघे रा. सोमवारपेठ, फलटण, ता. फलटण यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही अशीच अवैध धंद्याबाबत मोहिम चालू राहील व अवैद्य धंद्याबाबत गोपनीय माहिती दिल्यास नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल.
सदरची कामगिरी निखील पिंगळे साो पोलीस अधिक्षक, वैशाली कडुकर, विशाल खांबे साो, उप विभागिय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सुचनांनुसार राजकुमार भुजबळ, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ सहा. पोलीस निरीक्षक, अमोल जगदाळे पोहवा ब.नं १२९. नितीन चतुरे पो.हवा.ब.नं. १४२३, हणमंत दडस पो.कॉ ब.नं २४८९, तुषार नलवडे, पो.कॉ.ब.नं.७१६ यांनी या कारवाई मध्ये भाग घेतला.

No comments