फलटणचे अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.२७ मे २२०६ - फलटण येथे समर्पित, सहानुभूतीपूर्ण आणि प्रगत ऑर्थोपेडिक सेवा देणाऱ्या डॉ. प्रसाद जोशी यांना पुणे येथे प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त २३ मे २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील द ऑर्किड हॉटेलमध्ये आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे आणि लोकमत, पुण्याचे मुख्य संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे फलटणमधील गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या ऑर्थोपेडिक सेवेला मिळालेली दखल अधोरेखित झाली आहे.
ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. ही संस्था गेल्या १४ वर्षांपासून पर्यावरणीय परिसंस्था व्यवस्थापन क्षेत्रात विविध पथदर्शी प्रकल्प राबवत असून, संस्थेने भारताचे नॉर्वेमध्ये प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेचे श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले अहिवळे यांच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना संबंधित मान्यवरांनी ग्रीन सोल्युशन्स प्रा. लि. तसेच श्री. सागर अहिवळे आणि श्रीमती आरती भोसले अहिवळे यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान समाजाच्या उन्नतीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments