फलटणमध्ये ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा बीएलए -2 नोंदणी अभियान व सत्कार समारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मे - शिवसेना, २५५ फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या वतीने पदाधिकारी निवड आढावा व बीएलए -2 नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फलटण नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या मान्यवर सदस्यांचा भव्य सत्कार समारंभही यावेळी पार पडणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना, २५५ फलटण-कोरेगांव विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments