Breaking News

१२ लाख रुपये किंमतीचे एकूण ४० मोबाईल मुळ मालकांना परत

A total of 40 mobile phones worth Rs 12 lakh returned to their original owners

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मे - सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये सी. इ. आय. आर पोर्टलच्या माध्यमातून गहाळ मोबाईल शोधण्याबाबत  पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर मॅडम यांच्या सुचने नुसार सातारा जिल्हयात गहाळ मोबाईल शोध मोहीम राबविण्यात आली आहे.

    सदरच्या सुचने नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग विशाल खांबे, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सी. इ.आय. आर पोर्टलच्या आधारे तांत्रिक विष्लेषण करुन कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा या परराज्यासह महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धुळे आणि पुणे जिल्ह्यांतुन गहाळ मोबाईलचा शोध घेवुन सुमारे १२ लाख रुपये किंमतीचे ४० मोबाईल हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.

    आज दिनांक २५/०५/२०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल मुळ मालकांना परत देणेचा कार्यक्रम आयोजित करुन  उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तसेच तहसीलदार फलटण अभिजीत जाधव,  व पोलीस निरीक्षक फलटण शहर अरविंद काळे यांच्या हस्ते संबंधित मुळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले. यावेळी उपस्थीत नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करुन मोबाईल परत मिळाले बद्दल पोलीस प्रशासनाचे कौतुक केले.

    सन २०२४ ते आज अखेर गहाळ झालेले ४५५ मोबाईल फलटण शहर पोलीस ठाणे कडुन मुळ मालकाना परत देणेत यश आले आहे.

    सदर वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे व पोलीस निरीक्षक फलटण शहर  अरविंद काळे यांनी नागरीकांना मोबाईल चोरी अथवा गहाळ झालेस तात्काळ पोलिस ठाणेस संपर्क करणेचे आवाहन केले आहे.

    सदर मोबाईल शोध कारवाई मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अयोध्या घोरपडे, तसेच सी.इ.आय.आर. पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलीस अंमलदार स्वप्निल खराडे व पोलीस अंमलदार राणी फाळके, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, मुकेश घोरपडे, अतुल बडे, यांनी सहभाग घेतला होता.

No comments