Breaking News

ताथवडा येथे डराडो एनजीओ तर्फे वृक्षारोपण उपक्रम संपन्न

Tree plantation drive completed by Dorado NGO in Tathawada

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मे - फलटण तालुक्यातील ताथवडा येथे डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डराडो) यांच्या वतीने कै. ॲड. धोंडीराम अर्जुन खरात सर (निवृत्त प्राचार्य) यांच्या ६ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच ७६ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व बीजरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

    या उपक्रमात विविध प्रकारची वृक्षांची रोपे लावण्यात आली तसेच बीजरोपण करून भविष्यात हरित क्षेत्र वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून अशा उपक्रमातून समाजामध्ये जनजागृती होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

    यावेळी संस्थेच्या डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात, डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात, वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव तसेच संस्थेचे स्वयंसेवक राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे, श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे, हिम्मतराव खरात यांच्यासह ताथवडा गावातील जाधव, शिंदे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments