Breaking News

फलटण शहरात खंडणीसाठी सलूनमध्ये घुसून मारहाण करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद

Accused arrested for entering and beating up a parlor for extortion in Phaltan city

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ मेफलटण येथील सलून दुकान मालकास लोखंडी हत्याराचा धाक दाखवून मारहाण करून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास फलटण शहर पोलीसांनी केले जेरबंद.

    याबाबत अधिक माहिती अशी,  तक्रारदार श्री अशिष अशोक गाढवे यांचा जिंती नाका फलटण येथे किंग युनिसेक्स पार्लर नावाने सलूनचे दुकान आहे. दि.१९/०५/२०२६ रोजी सायं. ५.०० वा. चे सुमारास दुकानाचे समोर शाईन मोटार सायकलवर अनोखळी दोन इसम आले व त्यांनी दुकानात घुसून शिवीगाळ केली त्यापैकी पांढ-या रंगाचा शर्ट व जिन्स पँट घातलेल्या इसमाने कमरेतून सुमारे दोन फुटाचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून तक्रारदार यांना धमकावून, मला अभि भाई म्हणतात तु मला ओळखतोस का तु दुकान चालु केले आहे, तुला खल्लास करीन तु मला महिन्याला १०,०००/- रूपये हप्ता दे, अशी धमकी देऊन तक्रारदार व दुकानातील मुलांना धारदार लोखंडी हत्याराने मारहाण करून दुकानातील सामानाची तोडफोड केली. तसेच दुकानातील कामगार मोहम्मद फरमान याला व अजिम अहमद यालाही सोबत असलेल्या दुस-या लाल रंगाचा शर्ट जिन्स पॅन्ट डोक्यावर टोपी घातलेल्या इसमाने हातातील लोखंडी कडयाने मारहाण करून जखमी केले त्यांनतर दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केली म्हणून अनोळखी दोन इसमांविरूद्ध फलटण शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.१९७/२०२६ भा. न्या. संहि. कलम ३०८ (४), ११८ (१),३५२,३५१(२) (३), ३२४(४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे हे करीत आहेत.

    वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली यातील संशयित आरोपींचा गोपणीय बातमीदरामार्फत तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेतला असता सदर गुन्हयातील संशयित आरोपी नामे अभिजित अरूण जाधव वय २२ वर्षे, रा. मलटण, ता. फलटण जि. सातारा हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक तपास केला, असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने सदर संशयित आरोपी यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी याचेकडे अधिक चौकशी व विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचा साथीदार अक्षय जाधव रा. मलटण, फलटण यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, अटक आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपी याची दि.२३/०५/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. तसेच अटक आरोपी याचेकडून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व लोखंडी हत्यार जप्त करणेत आले आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याचेवर फलटण शहर पोलीस ठाणेस, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी व महिलाविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत.

    सदरची कारवाई मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सो, सातारा, मा.डॉ. श्रीमती वैशाली कडुकर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा मा.श्री विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, फलटण उपविभाग फलटण, यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे, सहायक पोलीस निरीक्षक, श्री नितीन शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार संतोष नाळे, जितेंद्र टिके, अतुल बडे, मुकेश घोरपडे, यांनी पूर्ण केलेली आहे.

No comments