Breaking News

आक्षेपार्ह कृत्याचा मुस्लिम समाजाकडून जाहीर निषेध ; कठोर कारवाईची मागणी

Muslim community publicly condemns offensive act; demands strict action

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ मे २०२६ - शुक्रवार पेठ, फलटण येथील अजीम हसन आतार याने केलेल्या कथित आक्षेपार्ह कृत्याचा फलटण शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

    याबाबत मुस्लिम समाजाच्या वतीने फलटण शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “छत्रपती संभाजी महाराज हे फलटणचे नातू असून प्रत्येक थोर व्यक्ती, संत-महंत यांच्याविषयी मुस्लिम समाजाला नेहमीच आदर आहे. संबंधित व्यक्तीने केलेल्या कृत्याशी मुस्लिम समाजाचा कोणताही संबंध नसून त्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.”

    तसेच फलटण शहर व तालुक्यात मुस्लिम समाज सर्वधर्म समभाव जपत शांततेत राहत असून, सर्व समाज गुण्यागोविंदाने एकोप्याने राहत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    दरम्यान, संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम समाजातर्फे करण्यात आली आहे.

No comments