Breaking News

सुनेच्या तोंडात तणनाशक ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न ; पती व सासू विरोधात गुन्हा

Attempt to kill daughter-in-law by pouring herbicide into her mouth; Crime against husband and mother-in-law

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ मे २०२६ - फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील माळवाडी येथे पत्नीला मारहाण करून तोंडात विषारी तणनाशक औषध ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती व सासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा प्रभाकर घनवट (वय ४१, रा. माळवाडी, कुरवली खुर्द, ता. फलटण, जि. सातारा) या आपल्या राहत्या घरी असताना पती प्रभाकर हनुमंत घनवट व सासू जनाबाई हनुमंत घनवट यांनी त्यांना “तुझ्यामुळे आमच्या घराचे वाटोळे झाले, तुझ्यामुळे अपंग मुलगा झाला, तू सारखी बडबड करतेस” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही हात मागे वळवून पिरगळत मारहाण करण्यात आली.
याच वेळी सासूने त्यांच्या तोंडात तणनाशक (विषारी) औषध ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकाराबाबत दाखल झालेल्या एमएलसीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

No comments