Breaking News

फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत

Illegal businesses are booming in Phaltan with the blessings of the police

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - दि.१९ मटका, जुगार, चक्री आदी अवैध धंदे तेजीत सुरू असताना पोलिस अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचा फास आवळण्यात महत्त्वाची भूमिका असलेली स्थानिक गुन्हे शाखा वसुलीच्या कामात गर्क आहे.

    शहरात धूम स्टाइलने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणे, जबरी चोर्‍या व घरफोड्या हे गुन्हे नित्याचे झाले आहेत. शहरात अवैध धंदे  जोरात सुरू असून, संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण पुरवण्यात येत आहे. खुद्द पोलिस उपअधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानाकडे जाणाऱ्या गिरवी नाका परिसरात टपरीवर मटका व गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. स्थानिक पोलिसांशी संगनमत करून खुलेआम मटका चालतो. 

    जुगाराचे मोठे अड्डे शहरात आहेत. ठरावीक रक्कम पोलिसांना दरमहा पोहोच केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. शहराच्या मध्यवस्तीत राजरोसपणे जुगार, चक्री सुरू असताना पोलिस दुर्लक्ष करतात. तर कोळकी, जाधववाडी अशा भागातही खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.

    शहरात मटक्याच्या अनेक टपर्‍या सुरू आहेत. त्यांच्याकडून दरमहा हजारो रुपये घेतले जातात. जुगाराचे मोठे अड्डे सुरू असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड केली जाते.  पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या अवैध धंद्याने  अनेकांचे संसार उध्वस्त  होण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्हा पोलिस प्रमुख वैशाली कडुकर लक्ष देणार का? 

    जिल्हा पोलिस प्रमुख वैशाली कडुकर यांनी फलटण शहरातील अवैध व्यवसायाला पोलिसांचे अभय मिळत असताना, कोणती भूमिका घेणार याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे. सुसंस्कृत फलटण शहराला अकार्यक्षम व अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे शहर वासियांना संकटाना सामोरे जावे लागत आहे.


No comments