Breaking News

क्रीडा स्पर्धांमुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास – प्राचार्य डॉ. पी. एच. कदम

Sports competitions contribute to the all-round development of students' personality – Principal Dr. P. H. Kadam

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ :  प्रियदर्शिनी ज्ञान प्रबोधिनीच्या विधी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ २८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे संस्थापक बॅरिस्टर राजा भोंसले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा नैपुण्याचा सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. नितीन भैय्या भोंसले होते, तर उपाध्यक्ष मा. श्री. शंतनू भोंसले यांची विशेष उपस्थिती लाभली.

    मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवल केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये संघभावना आणि स्पर्धात्मकता निर्माण करणे हा या स्पर्धांमागचा मूळ हेतू आहे. असे उद्गार कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री रणजीत शेळके यांनी केले.

    मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, "शिक्षणासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. खेळाडूवृत्ती ही जीवनातील आव्हाने पेलण्यासाठी महत्त्वाची ठरते." तसेच विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. मोरे सर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कु. जिया इनामदार व श्री. रणजित शेळके यांनी केले. आणि आभार प्रदर्शन एडवोकेट शितल सोनवणे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्याला विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.

No comments