Breaking News

महाराजा मल्टीस्टेटची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Maharaja Multistate's five-yearly election unopposed

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.11 -  महाराजा मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले  यांच्या कुशल नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, सलग चौथी निवडणूक बिनविरोध केली आहे.

    निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली याप्रसंगी  उपजिल्हाधिकारी कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव  सहाय्यक निबंधक  राहुल देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी  सभासदांच्या उपस्थितीत संचालकांची नावे जाहीर केली. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात विस्तारलेल्या आणि सुमारे 5 हजार सभासद असलेल्या मल्टीस्टेट  सलग चौथी पंचवार्षिक  निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा करिष्मा विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले  आणि व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले  यांनी केला आहे. सुमारे 800 कोटीची आर्थिक उलाढाल असलेल्या महाराजा मल्टीस्टेटला  विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी पारदर्शक कारभार, काटकसर,सभासदांचे व ठेवीदाराचे हित जोपासत  महाराजा मल्टीस्टेटला  प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. सन 2026-27ते सन 2031 -32 या कालावधीकरिता नव्याने निवडून आलेले संचालक मंडळ असे ः दिलीपसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, अ‍ॅड सौ. मधुबाला भोसले,सौ.प्रियदर्शनी भोसले,तुषार गांधी, हेमंत फुले, अमोल सस्ते, कुमार  भट्टड, विलास रसाळ,दिपराज तावरे, सुभाष आढाव.

No comments