Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट

Hon'ble MP Ranjitsinh Naik Nimbalkar met Prime Minister Narendra Modi

    फलटण गंधवार्ता वृतसेवा दि.२१ - माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिह  नाईक निंबाळकर यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर विविध विकास कामावर चर्चा करत असताना, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यास  रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार असताना टेक्निकल मंजुरी मिळाली होती, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने लक्ष घालून, संबंधित विभागास आदेश देऊन, लवकरच कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजुरी घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुंबई बेंगलोर कॉरिडोर हायवे  याबाबत सचिवांना  या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बारामती फलटण , फलटण पंढरपूर रेल्वे च्या कामाची संपूर्ण माहिती रणजितसिह  यांच्याकडून घेतली.

    अधिवेशन संपताच माढा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्नांसाठी लवकरच केंद्र शासन व राज्य शासन यांची लवकरच  संयुक्त बैठक लावण्याच्या सूचना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आहेत.  यामुळे मतदार संघातील अनेक प्रश्न या निमित्ताने मार्गी लागण्यास मदत होणार आहे असे मत मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे.

No comments