Breaking News

शिवसेनेच्या वतीने संजय मोरे व शरद कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे विविध कार्यक्रम

Shiv Sena organizes various programs in Phaltan on the occasion of the birthdays of Sanjay More and Sharad Kanse

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ - शिवसेना पक्षाचे राज्य सचिव संजय मोरे व सातारा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शरद कणसे यांचा वाढदिवस रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवसेना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे व शहरप्रमुख निलेश तेलखडे यांनी दिली.

    या निमित्ताने सकाळी ९ वाजता उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप, १० वाजता ओंकार वृद्धाश्रम,कुरवली येथे फळे व खाऊ वितरण, तसेच ११ वाजता मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय मूकबधिर विद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच दिव्यांग मुलांची कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

    या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच सर्व शिवसैनिकांनी रविवार दि. 22/2/2026 रोजी सकाळी 9.30 वाजता मूकबधिर विद्यालय, गोळेगाव ठाकूरकी (ता. फलटण) येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments