Breaking News

निंबळक येथील निमजाई मंदिरात चोरी

Theft at Nimjai temple in Nimbalak

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ -  मौजे निंबळक (ता. फलटण) येथील गावच्या हद्दीत असलेल्या श्री निमजाई देवी मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी ( दि. १९) सायं. ५ ते शुक्रवारी (दि. २०) पहाटे ५.४५ या कालावधीत हा चोरीचा प्रकार घडला आहे. याबाबत हणमंत पुरुषोत्तम गुरव (वय - ४५, व्यवसाय - पुजारी, रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

    तक्रारीनुसार, मंदिरातील देवीच्या डोक्यावर असलेला सुमारे ३० हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने लंपास केला. या मुकुटाचे वजन सुमारे ४०० ग्रॅम असून त्यावर विविध नक्षीकाम तसेच लाल रंगाचा खडा बसवलेला होता. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार येवले अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच संशयितांची चौकशी सुरू आहे.

No comments