Breaking News

फलटण येथे बास्केटबॉल स्पर्धेत न्यू ईरा हायस्कूल व शिवरत्न क्लबला विजेतेपद

New Era High School and Shivratna Club win the basketball tournament in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२१ -   जायंट्स ग्रुप व मुधोजी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बास्केटबॉल स्पर्धा मुधोजी क्लब,फलटण येथे उत्साहात संपन्न झाल्या. १२ आणि १४ वर्षांखालील गटात पाचगणीच्या न्यू ईरा हायस्कूलच्या संघाने मुला-मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अकलूजच्या शिवरत्न क्लब संघाने विजय मिळवला.

    फलटण येथे आयोजित केलेल्या बास्केटबॉल स्पर्धेत फलटण, पाचगणी, बारामती, अकलूज येथील संघांनी सहभाग घेतला होता. माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुधोजी क्लबचे सदस्य महादेव माने, सुभाषराव जाधव, बास्केटबॉल प्रशिक्षक बाळासाहेब बाबर, जायंट्स ग्रुपचे युनिट डायरेक्टर प्रभाकर भोसले, फेडरेशन ऑफिसर शिरीष शहा, अध्यक्ष शामराव निकम, माजी अध्यक्ष दीपक दोशी उपस्थित होते.

    स्पर्धेचा वयोगटानुसार अनुक्रमे पहिले तीन क्रमांक असे १२ वर्षांखालील गट मुले न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), शारदानगर हायस्कूल (बारामती), मुधोजी क्लब (फलटण). मुली न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), मुधोजी क्लब (फलटण). १४ वर्षांखालील गट मुले न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), शिवरत्न बास्केटबॉल (अकलूज), शारदानगर हायस्कूल (बारामती). मुली : न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), मुधोजी क्लब (फलटण), शिवरत्न क्लब (अकलूज). १७ वर्षांखालील गट मुले : शिवरत्न क्लब (अकलूज), न्यू ईरा हायस्कूल (पाचगणी), मुधोजी क्लब (फलटण).

    विजेत्या संघांना सुभद्राराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी उदय शहा, विठ्ठलराव माने, धनाजीराव जाधव, प्रकाश मोरे, प्रदीप फडे, बाबासाहेब गंगावणे, सुरेश शिंदे धनाजीराव घोरपडे, हणमंतराव घनवट आदी जायंट्सचे सदस्य यांच्यासह प्रत्येक टीमचे प्रशिक्षक, शिक्षक, पालक उपस्थित होते. सुरुवातीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

No comments