Breaking News

हरिभाऊ मुळीक, संदीप शेंडे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

100 workers including Haribhau Mulik, Sandeep Shende join BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३ - भाडळी बु. येथे राजे गटाला मोठा धक्का बसला असून, येथील सरपंच वसंतराव मुळीक यांचे बंधू हरिभाऊ मुळीक तसेच युवक नेते संदीप शेंडे यांच्यासह सुमारे १०० प्रमुख कार्यकर्त्यांनी आज ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

    मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्यावर विश्वास ठेवून गावातील तरुण कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रवेशामुळे भाडळी बु. गावात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी निवडणुकीत भाजपचे उमेदवार जयकुमार शिंदे व विकास नाळे यांना भाडळी गावातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

    या प्रवेश प्रक्रियेसाठी गावातील भाजप नेते गोपीनाथ डांगे, आकाश डांगे आणि ऋषिकेश भोईटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात बोलताना ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी भाडळी बु.च्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.

No comments