बरड गटातून शरद झेंडे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी; कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १ - माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी शरद झेंडे यांना बरड गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेकांनी केली असून त्यांची उमेदवारी नक्कीच त्यांच्या कार्याची पोहोचपावती असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एक सर्वसामान्य कुटुंबातील एक उमदे नेतृत्व म्हणून मुंजवडी येथील शरद तानाजी झेंडे, गेली 19 वर्षे झाले भाजपाच्या माध्यमातून माढा लोकसभा विस्तारक, फलटण कोरेगाव मतदारसंघाचे विस्तारक, तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी तथा फलटण तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी किमया शरद झेंडे हे दोघे काम करीत आहेत. झेंडे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे,, आमदार सचिन पाटील,नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच ॲड.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगार संघटनेचे विविध उपक्रम राबवुन २० हजार लोकांना लाभ मिळवून दिले आहेत.
शरद झेंडे यांनी मध्य प्रदेश येथे भाजपाचे निरीक्षक म्हणून ,केंद्रीय कृषी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान,यांच्या मतदारसंघात काम केले आहे, हैदराबाद येथे पक्षाचे शिबिर, राबवून भाजपाचे विचार प्रत्येक गावागावात पोहोचविले आहेत, त्यामुळे मुंजवडी, बरड राजुरी, दुधेबावी , जावली निंबळक मिरढे, तिरकवाडी, सोनवडी या भागातील मतदारांनी शरद झेंडे यांना जिल्हा परिषदेत पाठवावे अशी मागणी केली आहे.
शरद झेंडे यांनी, जनशक्ती बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील 20 हजार लोकांना फायदा मिळवून दिला असून ,बरड जिल्हा परिषद गट हा भाजपा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्यामुळे शरद झेंडे यांना बरड गटातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.


No comments