भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोफत लक्झरी बसेस सुविधा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३१ - भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी संग्राम अहिवळे मित्र परिवाराच्या वतीने मोफत 4 लक्झरी बसेस गाडीची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या संख्येने भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल होतात. ही बाब लक्षात घेऊन सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
या मोफत वाहनसेवेचा लाभ युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत संग्राम अहिवळे यांनी राबवलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

No comments