फलटण येथे राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धा उत्साहात संपन्न ; मुधोजी हायस्कूलचा मुलींचा संघ स्पर्धेत अव्वल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - क्रीडा व युवकसेवा , संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटीचे, मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षाखालील मुले/ मुली शालेय राज्यस्तरीय हॉकी क्रीडा स्पर्धा २०२५/२६ चा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल, फलटण या ठिकाणी संपन्न झाला.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील ८ विभाग ( नागपूर, मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, कोल्हापूर यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी एकूण ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला होता. या सर्व खेळाडूंची व कोच, संघ व्यवस्थापक यांची निवास व भोजन व्यवस्था श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, (एस एस सी ), नर्सिंग कॉलेज गर्ल्स हॉस्टेल, या ठिकाणी करण्यात आली होती. सर्व खेळाडूंना थंडीचे दिवस असल्यामुळे राहण्याची उत्तम सोय केली होती सर्व खेळाडूंना व त्यांच्या प्रशिक्षकांना गादी ,ब्लॅंकेट , गरम पाण्याची सोय देखील करण्यात आली होती.
सर्व सहभागी खेळाडूंना व त्यांच्या व्यवस्थापकांना सकाळचा नाश्ता चहा दुपारचे जेवण रात्रीचे जेवण देखील सोय केली होती.
या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा उपसंचालक (-कोल्हापूर विभाग) श्री सुहास पाटील साहेब, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री जगन्नाथ धुमाळ सर ,, ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद मेहता, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे साहेब , फलटण एज्युकेशन सोसायटी चे प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम सर , ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री महेश खुटाळे,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर साहेब, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आला, याप्रसंगी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री कदम साहेब,मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री वसंतराव शेडगे साहेब , ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य श्री माने सर, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य सौ शेख मॅडम, सौ दिक्षित मॅडम, नसरीन मिस तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री दळवी साहेब, सीनियर हॉकी खेळाडू श्री प्रवीण गाडे, श्री सुजित निंबाळकर तसेच सर्व सीनियर खेळाडू उपस्थित होते.
या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्री तुषार मोहिते सर, प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर साहेब व आभार जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री खुरंगे बी.बी. यांनी मानले.
या स्पर्धा 13 व 14 डिसेंबर या दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटांमध्ये कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणारा विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूर यांनी विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक नागपूर विभाग व तृतीय क्रमांक मुंबई विभागाने मिळवला. तसेच मुलींच्या गटामध्ये कोल्हापूर विभागाचे नेतृत्व करणारा मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांनी विजेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांक नागपूर विभागाने व तृतीय क्रमांक मुंबई विभागाने मिळवला.
या विजय संघांना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मेडल्स व ट्रॉफी देण्यात आली.
या स्पर्धेतून महाराष्ट्राचा 17 वर्षाखालील मुलींचा व मुलांचा संघ निवडण्यात आला. या स्पर्धेसाठी फलटण नगरपरिषद फलटण, सगुणामाता कन्स्ट्रक्शन , जिल्हा उप रुग्णालय यांचे विशेष सहकार्य लाभले.
या स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व क्रीडा शिक्षक श्री अनिल सुळ सर, श्री बनकर एस एस, श्री तायप्पा शेडगे सर,श्री सुरज ढेंबरे सर, श्री अमित काळे सर,, सौ मुलाणी मॅडम, सौ गावडे मॅडम, कु. धनश्री क्षीरसागर मॅडम, श्री अमोल सपाटे सर, श्री अनिल यादव सर, श्री संजय गोफने सर, श्री पवार सर, श्री बोंद्रे सर, श्री वाकुडकर सर, श्री प्रीतम लोंढे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील श्री रवी पाटील सर व त्यांचे सर्व सहकारी. तसेच सिनिअर हॉकी खेळाडू ऋषी पवार, विनय नेरकर, कपिल मोरे,अथर्व पवार,राज मोरे, सागर पुजारी, कु. श्रुती भोसले व मुधोजी हायस्कूलचे सर्व हॉकी खेळाडूंचे सहकार्य लाभले.

No comments