Breaking News

फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 चे अेयोजन

The Shrimant Malojiraje Agricultural Exhibition 2025 is being organized in Phaltan.
 फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण अंतर्गत दिनांक 25 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन 2025 चे आयोजन श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल येथील मैदानावर करण्यात येणार आहे असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी केले. श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शनाद्वारे कृषि क्षेत्रातील नवीन संशोधित व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे तसेच कृषि व कृषी संलग्नित क्षेत्राशी निगडित 200 हून अधिक कृषि निविष्ठा कंपन्यांचा सहभाग कृषि प्रदर्शनामध्ये होणार आहे. नामांकित ट्रॅक्टर कंपन्या, शेतीची अवजारे, सेंद्रिय शेती, पशू संवर्धन व संगोपन, डेरी, पोल्ट्री, पॉली हाऊस, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, बीज व रोपे, रोपवाटिका, जैविक तंत्रज्ञान, कृषि उपयोगी पुस्तके, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, हवामान आधारित संबंधित शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती, शेतीचे विविधीकरण, शेती यांत्रिकीकरण यांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे तरी फलटण परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात यावी असे आवाहन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण व कृषि प्रदर्शन आयोजन समिती यांच्याकडून करण्यात आली आहे. 

No comments