जाधववाडी माजी सरपंच - उपसरपंच यांच्यासह सदस्यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - माजी सरपंच मुनिष जाधव, उपसरपंच राहुल शिंदे व इतर मान्यवरांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढली असून, जाधववाडी गावात विकास निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव, उपसरपंच राहुल शिंदे व ग्रामपंचायत सदस्यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश झाला. याप्रसंगी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, बापू शिंदे उपस्थित होते.
जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव, उपसरपंच राहुल शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्ते यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात चालू केलेल्या विकास कामांचा धडाका पाहून व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामध्ये जाधववडी येथील गोविंद घनवट, मंगलताई, स्वाती जाधव,रेखाताई नाळे, सचिन गिरमे, सतीश टेंबरे, तानाजी धोतरे , मदन जाधव, चंद्रकांत शिंदे, दशरथ कोलवडकर, हेमंत कोळवडकर , राजेंद्र गिरमे, स्वप्नील शिंदे,गणेश शिंदे, प्रवीण धोतरे, महादेव धोतरे, शशिकांत जाधव, सोमनाथ घनवट, तेजस शिंदे या सर्वांचा समावेश आहे.

No comments