पुन्हा विजयी गुलाल खेळायचायं... रणजितदादांचा व्हाट्सअप स्टेटस संदेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - : पुन्हा एकदा विजयाचा गुलाल खेळण्याचा निर्धार व्यक्त करत माढा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील प्रत्येक खेड्या-पाड्यात कमळ फुलवण्याचा संदेश दिला आहे. “पुन्हा विजयी गुलाल खेळायचाय, तोही फलटण तालुक्यातील प्रत्येक खेड्या-पाड्यात. चला, प्रत्येक गावाच्या समस्या दूर करूयात आणि फलटण तालुक्यातील प्रत्येक गावोगावी कमळ फुलवूयात,” असा स्पष्ट आणि प्रेरणादायी संदेश त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे दिला आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे. या माध्यमातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना गावोगावी संघटन मजबूत करण्याचे, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय होण्याचे तसेच निवडणुकीच्या कामाला जोमाने लागण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या संदेशामुळे फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

No comments