Breaking News

फलटणच्या विकासासाठी कटिबद्ध; येणाऱ्या जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Committed to the development of Phaltan: Deputy Chief Minister Eknath Shinde

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्या वतीने ताकदीने लढवा. फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा शिवसेना संघटक विराज खराडे, फलटण तालुकाप्रमुख नानासो इवरे, फलटण तालुका संघटक विजय मायने तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा शुभहस्ते सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आत्तापासूनच कामाला लागण्याचे आवाहन करताना त्यांनी पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. फलटण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने नगरविकास व अन्य खात्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

No comments