अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फलटणच्या मुकुंद मोरे यांची ‘कविकट्टा’साठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ -अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘कविकट्टा’ या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी फलटण येथील मुकुंद मोरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या ‘एका उन्हाळी सुट्टीत’ या कवितेची निवड कविता निवड समितीतर्फे करण्यात आली आहे.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, शाहूपुरी सातारा आणि मावळा फौंडेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या कविकट्टा काव्यमंचावर मुकुंद मोरे हे दि. २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत आपली कविता सादर करणार आहेत.
या निवडीमुळे फलटणच्या साहित्यविश्वात आनंद व्यक्त केला जात असून विविध स्तरातून मुकुंद मोरे यांचे अभिनंदन होत आहे.

No comments