Breaking News

रणजितसिंह यांचे नाव संबंधित माणसांनी घेतलेय, मी कोणाची बदनामी केली नाही - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ; डीवायएसपी राहुल धस यांची चौकशी करावी

Ranjit Singh's name has been taken by the concerned people, I have not defamed anyone - Shrimant Ramraje Naik Nimbalkar; DYSP Rahul Dhas should be investigated

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५  - माजी खासदारांवर मी स्वतः कोणतेही आरोप केलेला नाहीत, त्यांच्यावर आरोप केले ते संबंधित माणसांनी केलेले आहेत, डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात स्वतः महिला डॉक्टर ने केलेल्या अर्जामध्ये खासदारांचा व पीएचा यांचा उल्लेख आहे, ननावरे आत्महत्या प्रकरणात देखील ननावरे कुटुंबीयांनी स्वतः रणजीतसिंह यांचे नाव घेतले होते, आगवणे प्रकरणात देखील दिगंबर आगवणे हा त्यांचा कार्यकर्ता होता व आगवणेंच्या मुलींनी रणजीतसिंह यांचे नाव घेतले होते, त्यात मी मास्टरमाइंड असण्याचा किंवा मी बदनामी करण्याचा सबंध काय येतो असा सवाल करत, डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात ज्या डीवायएसपींनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं त्यांची चौकशी करण्यात यावी तसेच पहिल्यांदा रणजीतसिंह यांची नार्को टेस्ट करावी सत्य बाहेर येईल अशी मागणी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

    फलटण येथील लक्ष्मी विलास या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर,श्रीमंत अनिकेतराजे यांची उपस्थिती होती.

    पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले राहुल धस यांचे मी नाव घेतले, त्यांना कुणी फलटणला आणले ते कुणामुळे आले, कोणा मुळे बदली मुंबईत झाली तरीही त्यांना घेऊन हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे घेऊन गेले व त्यांची बदली पुण्यात करण्यात यावी अशी मागणी केली,याचा शोध तुम्हीच घ्या माझ्या माहिती प्रमाणे एफ आय आर या माणसाच्या घरी लिहली जायची, त्यामुळे माझी पहिली मागणी आहे, पीडितेची आत्महत्या नैसर्गिक आहे की हत्या हे तपासात कळेल, पण डीवायएसपी राहुल धस यांची वेगळी चौकशी वेगळ्या एस आय टी मार्फत व्हावी, ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे.

    राहुल धस यांच्या चौकशी मागणी मी का करतोय तर फलटण मधील जेवढे अवैध धंदे आहेत, त्यांच्या कडून हे हप्ते घेत होते धस यांच्या काळात या २७७ केसेस ज्याचा उल्लेख अंधारे यांनी केला, आमच्याकडे अशी माहिती आहे, याचा एक ठरलेला फॉरमॅट आहे ज्यात फक्त नाव व तारीख बदलली जाते व सही केली जाते असे श्रीमंत रामराजेंनी सांगीतले.

    फलटण मध्ये चार कारखाने असताना फक्त त्यांच्याच कारखान्याच्या तक्रारी होतात आणि त्या सगळ्या डीवायएसपी राहुल धस यांच्या काळात होतात याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत, त्यावेळी मी सांगितले होते धस अस करू नका,बोलून उपयोग काय आमच्या लोकांच्या तक्रारीच घेत न्हवते धस पोलिस खात्याला कलंक असल्याचं रामराजे यांनी सांगितले,आमच सोडा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल का,तेव्हाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ज्याला त्याला सांगत होते,आमच्याकडे ये नाहीतर गुन्हा दाखल करण्यात येईल,त्याच्या पापाची फळे भोगावी लागली आता यांना,अशा त्या धस ला घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे गेले होते पुण्यात बदली करा म्हणून,आत्ताची जी घटना घडली त्यात मी कसा मास्टर माईंड,त्या मुलीने दिलेल्या पत्राची तारीख बघा त्यातून योग्य पद्धतीने लक्ष दिलं असत तर ही घटना घडलीच नसती,त्यावेळी या धस ने पीआय सुनील महाडिक व इतर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलाऊन घेतले असते तर ही घटना घडली नसती,त्यामुळे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांची चौकशी झालीच पाहिजे,आमच्या गटाच्या लोकांकडून पैसे खायचे, या फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास देताना तहसीलदार, प्रांत सगळे अधिकारी सामील असतात,बापूराव गावडे यांना सातारा एलसीबी ची धमकी दिली अन्  इकडे या म्हणून धमकावले जात होते, आदरकीचा खून कोणी केला कोणाचा पदाधिकारी आहे?आगवणे माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी उपोषणाला बसले होते,त्यावेळी मी फेस केले, दुधाने आंघोळ नाही केली असा टोला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लगावला,कोण खासदार? कोण पीए याची चौकशी केली का?बीड मधून मुकादम यांच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या मग हे प्रकरण वाढले मग का भानगडी करता,130 कोटींची बिले काढण्यासाठी मी खंडणी मागितली सांगून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी यांनी प्रयत्न केला,त्यावेळी तेच सांगत होते रामराजेंचे नाव घ्या असे सांगत होते, आर आर नाही तर एडिट करून नाव टाकले, मोबाइल क्रमांक दाखवा की रामराजे, दिलीपसिंह भोसले यांना ओपन स्पेस/जागा शाळेसाठी दिली, आता हे 75 व्या वर्षात निवडणूक लढवतायत तर मग मी 78 ला का नको असा सवाल त्यांनी केला तसेच मी त्यांचा मोठा मुलगा तेजसिंहला नगराध्यक्ष पदासाठी उभा करणार होतो पण हे गेले तिकडे असा गौप्यस्फोट रामराजेंनी केला.

    अत्यंत दुर्दैवी प्रसंग फलटण मध्ये घडला त्यातून काय सुरू आहे ते आपण पाहतोय गांभीर्य लक्षात घेऊन रामराजेंनी पहिली पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्याय बुद्धीवर विश्वास व्यक्त केला होता,या प्रकरणात माझ्यावर आरोप प्रत्यारोप फार दुर्दैवी आहेत,एका नाटकाचा अंत झाला आहे माजी खासदार रणजितसिंह यांना त्यांना गोवण्याचा प्रकार आहे असे सांगितले गेले,ज्या दिवशी दुर्दैवी घटना घडली डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपलं जीवन संपविले त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली,घटना घडल्या त्यात पोलिसांचे समोर आले खुलासे आपण पत्रकारांनी खुलासे बाहेर काढले,जागृत पत्रकारांनी हे बाहेर काढले, फिट अनफिट पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता, ते बाहेर काढले,असे आरोप करणे म्हणजे त्यांना ऑस्कर पुरस्कार प्रदान केला पाहिजे,ननावरे यांनी आरोप केले होते,आगवणे त्यांचा माणूस होता एकदा काँग्रेस एकदा भाजपा कडून निवडणूक लढवली होती,रामराजेंच्या विरोधात उपोषणाला बसले होते मग तिथ कोण मास्टर माईंड होता?असा सवाल उपस्थित केला.

No comments