Breaking News

फलटण तालुक्याची बदनामी रामराजेंमुळे झाली ; माझ्यासह रामराजे, अंधारे, मेहबूब शेख यांची नार्को टेस्ट करा - रणजितसिंह यांची मागणी

Phaltan taluka was defamed because of Ramraje; Narco test Ramraje, Andhare, Mehboob Sheikh along with me - Ranjit Singh's demand

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५  - माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण, आगवणे प्रकरण, ननवरे प्रकरण व मुकादम मारहाण प्रकरणात करण्यात आलेले आरोपाचे खंडन करत त्या संदर्भातील पुरावे, लाव रे तो व्हिडिओ एलईडी स्क्रीनवर प्रसारित केले व या षडयंत्र पाठीमागे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचे सांगतानाच,  माझ्यासह रामराजे, सुषमा अंधारे, महबूब शेख यांची लाय डिटेक्टर व नार्कोटेस्ट करावी, म्हणजे दूध का दूध पानी का पानी होईल अशी मागणी करतानाच, रामराजे तुम्हीच उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना व्हिडिओ दिला तसेच तुमच्या एका भावाच्या बंगल्यातून जयश्री आगवणे बाहेर आल्या व एका भावाला मेहबूब शेख भेटल्याचा गौप्यस्फोट करीत रामराजेंवर निशाणा साधत तुमचे दोन पीए एक मुकुंद रणावरे व पांडुरंग गुंजवटे यांनी फोन केल्याचे सांगत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर पत्रकार परिषदेत रामराजेंच्या कट कारस्थानचा पाढा वाचला व या माणसाने फलटण तालुक्याची अब्रु घालविली असे सांगितले.

    डॉक्टर महिलेचे चारित्र्यहनन व्हायला नको म्हणून आरोप होऊनही मी गप्प होतो, परंतु त्यांचे आरोप थांबत नव्हते. बदनामी सहन करायलाही मर्यादा असते. ननावरे कुटुंबीय, डॉक्टर युवतीची आत्महत्या, आगवणेंच्या मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, मुकादमांना मारहाण या कोणत्याही प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. फलटणचा विकास होतोय, ते बदलतेय, हे पाहावत नसल्यामुळे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजेंच्या मास्टमाइंडमधून ही सर्व प्रकरणे माझ्यावर शेकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नार्को चाचणी, लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार आहे.रणजितसिंह म्हणाले डॉक्टर युवतीच्या चिठ्ठीत माझे नाव नाही,माझ्या पीएचे नाव घ्यायला रामराजेंनीच लावले डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणात दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे,दिगंबर आगवणेने कर्ज थकविल्यामुळेच त्याच्यावर कारवाई करण्यात अलिअसून,  आगवनेने खोटे आरोप केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे, माझ्यावर पेट्रोल चोरी, गाडीचे भाडे दिले नाही, विनयभंग, अॅट्रॉसिटी अशा अनेक हस्यास्पद व खोट्या तक्रारी केल्या,मुकादमांवर २७७ गुन्हे दाखल केल्याचा माझ्यावर आरोप होतो परंतु संपूर्ण जिल्ह्यात चार वर्षांत केवळ १६० गुन्हे दाखल आहेत असेही रणजितसिंह यांनी सांगितले,माझ्या साखर कारखान्याच्या केवळ १२ तक्रारी, पैसे बुडवणाऱ्यांवर गुन्हा नको का?आरोप करणाऱ्या एकाही मुकादमाला डॉक्टर युवतीने तपासले नव्हते असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

    माझ्यावर आरोप करायला लावण्यासाठी मुकादमांना फलटणमधून माणसे भेटायला गेली होती,ननावरे कुटुंबीयांनीच माझा आत्महत्या प्रकरणात सहभाग नाही हे यापूर्वीच सांगितले आहे ,आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी रामराजेंनी आगवणेच्या मुलींचे ट्रेनिंग घेतलेचा घणाघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

    रामराजे नाईक निंबाळकर या प्रकरणात  मास्टरमाइंड आहेत,त्यांना या युवतीशी व त्यांच्या कुटुंबीयांशी कसलीही सहानुभूती नाही. त्यांचे हे मगरमच्छके  अश्रू आहेत. गेल्या काही वर्षांत फलटण बदलतेय, अनेक विकासकामे होत आहेत. हे त्यांना सहन होत नाही. सर्वसामान्य व्यक्ती मोठा झालेला त्यांना सहन होत नाही. मी बापजाद्यांच्या जिवावर मोठा झालेलो नाही. माझ्या वडिलांनाही हॉटेलमध्ये काम करावे लागले होते परंतु मी त्यांच्या नावाने साखर कारखाना उभा केला. हे सर्व पाहावत नसल्यामुळे माझ्यावर इतरांच्या मार्फत आरोप करण्याचे षडयंत्र रचले गेले. आत्महत्या केलेल्या बहिणीचे चारित्र्यहनन नको म्हणून मी गप्प होतो; परंतु त्यांचे आरोप थांबायचे नाव घेत नव्हते. संपूर्ण राज्यात, बीड जिल्ह्यात माझ्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण केले. बदनामी सहन करण्याचीही एक मर्यादा असते. त्यामुळे मला बोलावे लागत आहे,माझे चारित्र्य माहीत असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला क्लीनचीट दिली परंतु त्यांनाही कमीपणा नको. गुन्हा केला असेल, तर मी शिक्षा भोगायला घाबरणार नाही परंतु काही केले नसल्याने कोणाच्या बापाला भिणार नाही.

    या सर्व प्रकरणात माझा सहभाग आहे, की नाही हे तपासण्यासाठी मी जाहीरपणे नार्को टेस्ट, तसेच लाय डिटेक्टर चाचणीला तयार आहे. कोणतेही रुग्णालय निवडा, कोणतेही डॉक्टर बोलवा मी मागे हटणार नाही. सर्व टेस्टचे पैसे मी भरतो.अगदी मुंबईमध्ये भर चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली एखाद्या स्टेजवर चाचणीसाठी मी तयार आहे. काय विचारायचे ते प्रश्न विचारा. माझी पहिली चाचणी झाल्यानंतर तुमचीही चाचणी करायची. तुमच्या दम असेल तर माझे हे आव्हान स्वीकारा." आरोप करून बिळात जायचे नाही. जाहीर माफी मागा अन्यथा चाचणीला तयार व्हा, असे आव्हान रणजितसिंह यांनी रामराजे यांना आव्हान दिले.

    सुषमा अंधारे व मेहबूब शेख यांच्यामागे रामराजे असल्याचा आरोप रणजितसिंह यांनी केला. सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत शस्त्रपूजन करत असल्याचा रणजितसिंह यांचा व्हिडिओ दाखवला होता. तो त्यांनी आज स्क्रिनवर दाखवला. हा व्हिडिओ संपल्यावर तो आर. आर. निंबाळकर या व्यक्तीने पाठविल्याचे अंधारे यांच्या मोबाईलमध्ये दिसत होते. त्यावरून सर्व आरोपांमागे रामराजेच असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे माहिती पुरवणाऱ्याने चुकीची माहिती दिली असल्याने मी त्या दोघांना माफ करतो, असे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.

    कुटे ग्रुपचा व्यवहार फक्त ७५ कोटींचा असून तोही २०१८ मध्ये झाला आहे त्यांनी तिकडे 1400 कोटी सांगितला त्यात माझी काय चूक आहे? असा सवाल रणजितसिंह यांनी यावेळी केला.

    जाहीर पत्रकार परिषद झाल्यानंतर उपस्थित महिलांकडून रणजितसिंह यांची नजर उतरविण्यात आली. त्यानंतर महिलांनी त्यांना दुग्धाभिषेक घातला.

No comments