स्थानिक समीकरणा नुसार होणार निर्णय ; भाजप कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा
सातारा दिनांक ८ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीने शनिवारी साताऱ्यात फर्न हॉटेल येथे तातडीची बैठक घेऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील दहा पालिकांच्या कार्यक्षेत्रात सुरू करण्याचे स्पष्ट संकेत दिले .तसेच निवडणूक कमळ चिन्हावर लढवली जाणार असून त्या त्या नगरपालिका कार्यक्षेत्रात युती की स्वबळ याचा परिस्थिती सापेक्ष निर्णय घेतला जाईल अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या या बैठकीला भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष अतुल भोसले,कराड दक्षिणचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हा निवडणूक समन्वयक धैर्यशील दादा कदम तसेच जिल्हा कार्यकारणीचे मंडल व केंद्रप्रमुख या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली .सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा दहा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या त्या नगरपालिका कार्यक्षेत्रात संबंधित लोकप्रतिनिधी व जिल्हा कार्यकारिणीचे समन्वयक स्थानिक राजकीय समीकरणे पाहून निर्णय घेणार आहेत सातारा जिल्ह्यात भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडून सूचना आलेले आहेत .सातारा जिल्ह्यात नगराध्यक्ष नगरसेवक तसेच यापुढील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा मतदार संग्रह कसा वाढेल या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली .या सर्व निवडणुका कमळ चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचे सातारा जिल्ह्याची निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले.
सातारा नगरपालिकेसह इतर नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये इच्छुकांच्यामुलाखतीचा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे . साताऱ्यात विसावा नाका येथील भाजप कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती विधानसभा संयोजक अविनाश कदम, सातारा विकास आघाडी माजी पक्षप्रतोद ॲड दत्ता बनकर, हे घेणार आहेत .सातारा शहरांमध्ये प्रत्येक प्रभागातून तीन नावे गुणवत्ता निहाय सुचवली जाणार असून त्याचा अहवाल जिल्हा कार्यकारणी कडून हा निवडणूक प्रमुख शिवेंद्रसिंहराजे यांना सोपवला जाणार आहे .त्या अहवालाची प्रदेश कार्यकारणी कडून सुद्धा चाचपणी केली जाणार आहे .या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी बैठकीत सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटितपणे काम करून भारतीय जनता पार्टीची सातारा जिल्ह्यात ताकद कायम ठेवण्याचे आवाहन केले .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टी मधील सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान करून इच्छुक उमेदवारांना गुणवत्ता निहाय योग्य ती संधी निश्चितच दिली जाईल असे आश्वासन देत पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले.
शिवेंद्र सिंह राजे यांची पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे बोट
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोमिलनाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवले आहे .स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भाने अजून काहीही हालचाल झालेली नाही तरीसुद्धा पत्रकारांचा रोख साताऱ्याकडे का असा प्रश्न त्यांनी केला ?त्या त्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधी आणि कोर कमिटीचे समन्वयक निर्णय घेतील त्या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले .खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलन आहेच अशी आठवण त्यांना करून दिली असता शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले मग हा प्रश्न त्यांनाच तुम्ही विचारा.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता मीच लढवतो
खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जोरदार बॅटिंग केली .म्हणून मी लग्नावर पुन्हा एकदा पत्रकारांना आश्वस्त करत ते म्हणाले भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीने काम करत आहे .भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले .तसेच नगराध्यक्ष पद या विषयावर त्यांना छेडले असता ते म्हणाले आता मी खासदारकीचा राजीनामा देतो आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी स्वतःच लढवतो.

No comments