संस्था आपल्या दारी... दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर खुंटे येथे जयश्री नागरी सहकारी पतसंस्थेचे होणार उदघाटन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑक्टोबर २०२५ - संस्था आपल्या दारी या उपक्रमाचे माध्यमातून अल्पावधीतच ठेवदार कर्जदार व छोट्या मोठ्या व्यवसाईकांना आर्थिक स्थर्य प्राप्त करून देत "पैशांवार विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा" अशा पद्धतीने पारदर्शक व्यवहार व त्या व्यवहारातून सर्वसामान्य लोकांच्या पसंतीस उतरलेल्या जयश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण च्या खुंटे येथील नूतन शाखेच्या उदघाटन सोहळा विजयादशमी (दसरा)मुहूर्तावर 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते अच्युतराव खलाटे पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी खुंटे सह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन दयानंद पडकर व व्हाईस चेअरमन राजेंद्र खलाटे पाटील यांनी केले आहे.
या उदघाटन सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जालिंदर खलाटे पाटील,जिंती विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन व श्रीराम बझार चे संचालक अनिल बापू रणवरे, सस्तेवाडी गावाचे तंटामुक्त अध्यक्ष सतीश शेठ सस्ते,ग्रामपंचायत खुंटे चे सरपंच हनुमंत भिसे, बारामती तालुका दूध संघांचे संचालक प्रशांत उर्फ राजाभाऊ खलाटे पाटील, शिंदेवाडी गावचे सुपुत्र उद्योजक पुणे पिंपरी चिंचवड चे अमित भैया शिंदे, चौधरवाडी चे सामाजिक कार्यकर्ते हेमंत भोसले, पत्रकार यशवंत खलाटे पाटील तसेच संस्थेचे सर्व संचालक व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये होणार असून या ऐतिहासिक उदघाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments