नगर परिषदेसमोर उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलास आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे नाव द्यावे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ ऑक्टोबर २०२५ - नगर परिषदेसमोरील उभारत असलेल्या व्यापारी संकुलास आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे क्रांतिवीर उमाजी नाईक तालीम मंडळाच्या व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या यांना दिलेली निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण नगर परिषदे समोर असलेल्या जुन्या बागेच्या जागेत बांधकाम करीत असलेल्या व्यापारी संकुल इमारतीस, आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या नावाने नामांकन करावे, जेणे करून आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांनी केलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश सरकार विरोधात केलेल्या शौर्याची आठवण सर्व समाज बांधवांना होत राहील.
No comments