Breaking News

८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार

Monsoon will depart from the state from October 8

    मुंबई -  राज्यातील बहुतांश भागात 29 सप्टेंबर 2025 पासून हवामान स्थिर आहे. मात्र 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

    राज्यात 7 ऑक्टोबर 2025 पासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे 8 ऑक्टोबर 2025 पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

No comments