तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (एसएससी)च्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ - मुधोजी महाविद्यालय फलटण येथे दिनांक 13 आणि 14 ऑक्टोंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल एस एस सी जाधववाडी फलटण येथील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून कराड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
1) कबी खान (१९ वर्ष वयोगट) - भालाफेक प्रथम क्रमांक, थाळीफेक - द्वितीय क्रमांक
2) अमन निकाळजे (१९ वर्ष वयोगट) - थाळीफेक प्रथम क्रमांक
3) श्रेयश भोसले (१७ वर्ष वयोगट) - भालाफेक प्रथम क्रमांक, गोळा फेक तृतीय क्रमांक ,थाळीफेक तृतीय क्रमांक
4) श्रेयश ढेकळे (१७ वर्ष वयोगट) - भालाफेक द्वितीय क्रमांक, 800 मीटर धावणे द्वितीय क्रमांक
5) प्रणय जगताप (१७ वर्ष वयोगट) - 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक
6) मधुसूदन जाधव (१४ वर्ष वयोगट) - थाळीफेक तृतीय क्रमांक
7) 4×100 मी. रिले प्रथम क्रमांक- श्रेया पवार, अनुष्का नाईक निंबाळकर, श्रावणी पिंगळे, मनस्वी गायकवाड,तनिष्का भगत
8) स्मिता माने (१९ वर्ष वयोगट)- थाळी फेक प्रथम क्रमांक, गोळा फेक द्वितीय क्रमांक
9) श्रावणी पिंगळे (१४ वर्ष वयोगट) - गोळा फेक तृतीय क्रमांक
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. अंजुम शेख, सुहास कदम सर, परविन मुलाणी मॅडम आणि विद्यालयातील शिक्षक आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी अरविंद सखाराम निकम, चेअरमन फलटण क्रीडा समिती शिवाजीराव घोरपडे प्रचार्या अंजुम शेख, शिक्षक, शिक्षिका आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
No comments