स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड फलटणला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ सप्टेंबर२०२५ - पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार नवी दिल्ली येथे दिल्लीचे मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या हस्ते स्वराजचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्विकारला.
भारतामध्ये नवीकरणीय ऊर्जा आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक व अभिमानाचा क्षण ठरला आहे. स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड या कंपनीला “इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025” ने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीला “पर्यावरण संरक्षण व उच्च दर्जाची उत्पादन कार्यक्षमता साध्य करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान अवलंबणारा शुगर इथेनॉल उत्पादक” या विशेष श्रेणीत प्राप्त झाला आहे. या समारंभाला ऊर्जा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड ही कंपनी साखर कारखान्याशी संलग्न डिस्टिलरी प्रकल्पाद्वारे इथेनॉल उत्पादन करते. कंपनीने खालील क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. उत्पादन प्रक्रियेत कमी ऊर्जा वापरून जास्त उत्पादन साध्य करत आहे. औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारा कचरा व सांडपाणी याचे योग्य व्यवस्थापन नेट झिरो कार्बन एमिशन” ध्येय साध्य करण्यासाठी सततची धडपड कंपनीच्या या प्रयत्नांमुळे इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम (EBP) अंतर्गत देशाच्या ऊर्जासुरक्षेला हातभार लागतो तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळते. या सन्मानामुळे स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेडला देश-विदेशातील हरित ऊर्जा उद्योगामध्ये नवे स्थान प्राप्त झाले आहे.
स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड ही एक प्रगतिशील ऊर्जा कंपनी असून, साखर, इथेनॉल आणि वीज निर्मिती क्षेत्रात अग्रगण्य स्थान राखते. कंपनीची स्थापना शाश्वत ऊर्जा व हरित तंत्रज्ञानाच्या उद्दिष्टाने करण्यात आली. ऊसावर आधारित साखर, इथेनॉल उत्पादनासोबतच वीज निर्मिती व कचऱ्याचे व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक औद्योगिक मॉडेल उभे केले आहे.
इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025 हा सन्मान केवळ कंपनीसाठी नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारतासाठीही गौरवाचा क्षण आहे. हा पुरस्कार स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेडच्या शाश्वत ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि हरित भविष्यासाठीच्या कटिबद्धतेचे द्योतक ठरला आहे. या पुरस्कारामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान वाढला आहे. कारखान्याचे कामकाज ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. त्या शेतकऱ्यांना येणारे अडीआडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
No comments