दुष्काळात दुग्ध व्यवसायाने ग्रामीण भागाला तारले, या व्यवसायानेच महिला आणि तरुणांना उद्योजक बनण्याची संधी दिली : आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ सप्टेंबर२०२५ - गोविंदच्या माध्यमातून या तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून सुरु करण्यात आलेला दुग्ध व्यवसाय आज प्रमुख व्यवसाय बनला आहे, तथापि सन २००३/२००४ मध्ये फलटण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला, त्यावेळी दुग्ध व्यवसायानेच ग्रामीण भागाला तारले, ज्या भागात दुग्ध व्यवसाय नव्हता तेथील लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागल्याचे निदर्शनास आणून देत गोविंदच्या माध्यमातून येथील महिला आणि तरुणांना रोजगाराची आणि उद्योजक होण्याची संधी उपलब्ध झाल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रा.लि.,फलटणच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी आमदार दिपकराव चव्हाण, गोविंदचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालिका श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर, संचालक चंद्रशेखर जगताप, चंद्रकांत रणवरे, गोविंदचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला, चीफ फायनान्स ऑफिसर आनंद धूत, प्लांट मॅनेजर गणेश बाबू, प्रोजेक्ट हेड गुड्डूभाई हात्तुरकर, ए.जी.एम.फायनान्स अमोल चावरे, दुग्ध व्यवसाय विभाग प्रमुख डॉ.शांताराम गायकवाड, दूध संकलन विभाग प्रमुख डॉ.गणेश सपकळ, सहाय्यक दूध संकलन विभाग प्रमुख बापूसाहेब हिप्परकर व ज्ञानेश्वर शिंदे, एच.आर.योगेश रणवरे, रिसर्च & डेव्हलपमेंट विभाग प्रमुख भीमराव जमदाडे, आर.एम.आर.डी.विभाग प्रमुख देवेंद्र घनवट, ए.जी.एम.प्रॉडक्शन डी.एम.शिंदे, ए.जी.एम. क्वालिटी कंट्रोल अजित आटोळे, कम्युनिटी सेल्स मॅनेजर ऑल इंडिया आणि इंटरनॅशनल मार्केट भारत निंबाळकर, मॅग्नेशिया केमिकल्स डायरेक्टर संजय कुलकर्णी, अविनाश लडगे, भारत पालकर, अरिष्टा केमिकल्स डायरेक्टर डॉ.सतीश जगताप, कुरोली फूड्स मॅनेजिंग डायरेक्टर शंकरराव ठाकरे, कुरोली फूड्स डायरेक्टर रामदास कदम, व्यंकटेश ऍग्रो फॅक्टरी मॅनेजर इंद्रजीत मोरे, घी सेक्शन मॅनेजर अजय जाधव, मेंटनस मॅनेजर सुजीत भराडे, सिनियर एक्झिक्यूटिव्ह लॉजिस्टिक राजेंद्र लोंढे-पाटील, हायजिन इन्चार्ज हनुमंत लोखंडे उपस्थित होते, गोविंद मिल्कच्या वर्धापनदिन सोहळ्यास श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, व्हा.चेअरमन नितीन भोसले, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, माजी सभापती वसंतकाका गायकवाड, शंकरराव माडकर, दत्तात्रय गुंजवटे, श्रीमंत रामराजे मोटार मालक संघाचे संचालक शिवाजीराव लंगुटे, सीए व्ही.एस.जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, विश्वासदादा गावडे, मालोजी बँक व्यवस्थापक राजेश लढ्ढा, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य हेमंत रानडे, शिरीष दोशी, डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, भोजराज नाईक निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर, अरविंद निकम (सर), प्रा.भीमदेव बुरुंगले, बाळासाहेब खलाटे, विठ्ठलराव गौंड, नितीनभैय्या भोसले, महादेवराव माने, नितीन शिंदे, उमेश नाईक निंबाळकर, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्याचे भविष्य घडविण्यात ३० वर्षे गेली
गेल्या ३० वर्षात तालुक्यातील दुग्ध व्यवसाय सुधारणे, बिघडलेले साखर कारखाने दुरुस्त करणे, दुष्काळी भागासाठी कृष्णेचे पाणी आणणे, तालुक्याच्या राजकारणाला योग्य दिशा देताना तालुक्याचे भविष्य घडविण्यात गेल्याचे सांगताना याच कालावधीत श्रीमंत संजीवराजे यांनी गोविंदची उभारणी केली, तो उत्तम प्रकारे वाढविला, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय पुढे आणताना महिला आणि तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि खऱ्या अर्थाने दर्जेदार उत्पादनाद्वारे गोविंद हा विश्वासार्ह ब्रँड निर्माण केला, त्यामध्ये श्रीमंत सौ.शिवांजलीराजे, श्रीमंत सत्यजीतराजे आणि दूध उत्पादक, सेंटर चालक यांची मोलाची मदत झाल्याचे आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले.
गोविंदने विविध सुविधाद्वारे दूध उत्पादकांचे हित जपले
राजकारणात सक्रिय राहुन दुधाचा धंदा मोठ्या स्पर्धेत, तोही ग्रामीण भागावर अवलंबून राहुन यशस्वी करणे ही मोठी कसरत गेल्या ३० वर्षात श्रीमंत संजीवराजे यांना करावी लागली तथापि आज गोविंदची उत्पादने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देश परदेशातही पोहोचली असून त्यांच्या दर्जेदार आणि गुणवत्तेमुळे लोकप्रिय ठरली आहेत, डायनामिक्स सारखी डेअरी असताना गोविंदचा ब्रँड तयार होतोय, महाराष्ट्रात खपतोय, सर्वत्र प्रचारात राहतोय, लोकप्रिय होतोय ही अभिनंदनाची आणि कौतुकास्पद बाब आहे, मुंबईत ९०/१०० रुपये लिटर विकणाऱ्या या दुधातून दूध उत्पादकांना किती मिळतात, शासनावर अवलंबून असणारे या व्यवसायातील निर्णय शेतकऱ्यांना किती फायदा देतात याकडे लक्ष न देता गोविंदने दूध उत्पादकांचे हित जपल्याचे त्यांनी दूध उत्पादकांना दिलेल्या विविध सुविधा, दर्जेदार दूध उत्पादनासाठी दिलेले खास प्रशिक्षण, दर्जेदार पशुखाद्य, अधिक दूध उत्पादन देणारी जनावरे आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळाले पाहिजे, यासाठी राबविलेली संकल्पना आज दूध उत्पादकांचे हित जपणारी झाली असल्याचे आ.श्रीमंत रामराजे यांनी आवर्जून सांगितले.
महिला व तरुण वर्ग उद्योजक म्हणून पुढे आले
या तालुक्यातील दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सन १९९५ मध्ये आपण फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मदतीने दूध संकलन सुरु केले, त्यावेळी दररोज केवळ २००/२५० लिटर एवढे अत्यल्प दूध संकलित होत असे ते बर्फ लावून पुण्याच्या कात्रज डेअरीत पोहोचविले जात असे, किंवा तळेगाव येथे कॅडबरी उद्योगाला पुरविले जात असे, त्यांना अधिक दुधाची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर दूध संकलन वाढविण्यासाठी गोविंदची उभारणी केली, आज एका दूध संकलन केंद्रावर दररोज ३०/३५ हजार लिटर दूध संकलन होत असून गोविंद दररोज ७ लाख लिटर दुधाचे संकलन करुन अनेक दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती आणि त्यांना देश परदेशात मोठी बाजारपेठ मिळवून देण्यात यशस्वी झाल्याने शेतीला जोड धंदा म्हणून सुरु करण्यात आलेला हा व्यवसाय मुख्य व्यवसाय बनला असून प्रामुख्याने महिला आणि तरुण वर्ग या व्यवसायात उद्योजक म्हणून पुढे आल्याने असंख्य कुटुंबे आज या व्यवसायावर समाधानी असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी अभिमानाने सांगितले.
धवलक्रांती व हरितक्रांती तालुक्याच्या हिताची
गोविंदच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक निर्माण करताना गोविंदला अनेक आव्हाने, संकटांचा सामना करावा लागतो आहे, तथापि श्रीमंत सौ.शिवांजलीराजे आणि श्रीमंत सत्यजीतराजे येथील जुन्याजाणत्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा व्यवसाय पुढे नेत असताना ग्रामीण भागातील असंख्य महिला आणि तरुण वर्ग या व्यवसायात पुढे येऊन यशस्वी होताना पाहिल्यानंतर मोठे समाधान लाभत असल्याने येणारी आव्हाने आणि संकटांचा सामना करताना आपल्याला अजिबात त्रास होत नसल्याचे निदर्शनास आणून देत, या भागातील शेतकरी शेतीला पाणी नसल्याने संकटात होता, त्याला दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दिलासा देत असतानाच आ.श्रीमंत रामराजे यांनी मोठ्या कष्टाने आणि संघर्षातून कृष्णेचे पाणी या भागात आणल्याने येथे दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून धवलक्रांती आणि कृष्णेच्या माध्यमातून झालेली हरितक्रांती निश्चितच तालुक्याच्या विकासात नवे पर्व निर्माण करणारी ठरल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
शेती परवडत नसल्याने दुग्ध व्यवसायाला स्थिरता प्राप्त करुन देण्याची आवश्यकता
तालुक्यातील दूध उत्पादक गोविंदचे सेंटर चालक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय पुढे नेत असताना शेतमालाला रास्त भाव मिळण्यात असलेल्या अडचणी, नैसर्गिक अस्थिरता, शेतीसाठी आवश्यक असणारी खते, बी-बियाणे, औजारे यांच्या किंमतीत आणि मजुरीमध्ये होत असलेली प्रचंड वाढ विचारात घेता शेती व्यवसाय परवडणारा नसताना आगामी काळात शासकीय धोरणातून अन्य देशातील स्वस्त दूध या देशात आयात केले गेले तर येथील दुग्ध व्यवसायावर आणखी मोठे संकट येण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करताना आगामी काळात दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, दूध उत्पादनासाठी अधिक दूध देणाऱ्या कालवडींची निर्मिती आणि कमी खर्चात अधिक दूध उत्पादन या गोष्टी सांभाळून येथील दुग्ध व्यवसायाला स्थिरता प्राप्त करुन देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन गोविंदच्या माध्यमातून त्याबाबत सुरु असलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत, आगामी काळात त्यामध्ये आणखी सुधारणा केली जाईल आणि त्यातून येथील दुग्ध व्यवसायाला स्थिरता प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
गोविंद सर्व आव्हानावर मात करेल
प्रारंभी डॉ.गणेश सपकाळ यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केले, डॉ.शांताराम गायकवाड यांनी प्रास्तविकात ३० व्या वर्धापन दिन कार्यक्रमाची रुपरेषा व २ दिवसातील कार्यक्रमाचे नियोजन उपस्थितांसमोर ठेवले,
गोविंदचे कार्यकारी संचालक धर्मेंद्र भल्ला यांनी गोविंदच्या प्रगतीचा आढावा घेत या व्यवसायातील आव्हाने, अडचणी याचा उहापोह करताना गोविंद या सगळ्यावर मात करेल असा विश्वास व्यक्त केला. डॉ.माधुरी ढमाले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
गोविंद मिल्कच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त २ दिवस चाललेल्या सोहळ्यात आता होऊ द्या धिंगाणा व समीर चौगुले यांचा सम्या सम्या मैफिलीत माझ्या हे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर झाले. यासाठी प्रदीप कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments