Breaking News

फलटणचे फार्मासिस्ट विजय जाधव यांचा उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव

Phaltan pharmacist Vijay Jadhav honored for his remarkable contribution

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ सप्टेंबर२०२५ - फलटण शहरातील विजय मेडिकलचे श्री. विजय दत्ताजीराव जाधव यांनी फार्मसी व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना "प्रशस्तिपत्र" प्रदान करण्यात आले.

    जी. के. गुजर मेमोरिअल चारिटेबल ट्रस्ट, कराड व डॉ. अशोक गुजर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कराड यांच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी कराड येथे झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला.

    जाधव यांनी औषधांचा योग्य वापर, स्वच्छता, प्रतिजैविकांचा समतोल वापर, निरोगी जीवनशैली याबाबत रुग्णांना सतत मार्गदर्शन केले आहे. तसेच फार्मसी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करणे व सतत शिक्षणाच्या माध्यमातून अद्ययावत राहण्याचा प्रयत्न केला आहे.

    त्यांच्या या कार्यामुळे समाज व फार्मासिस्ट समुदायाला प्रेरणा मिळाली असल्याचे या वेळी गौरवोद्गारांतून सांगण्यात आले.

No comments