Breaking News

देवेंद्र महेश सुतार आणि शिवराज शेंडे यांचे रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप'मध्ये उज्ज्वल यश

Devendra Mahesh Sutar and Shivraj Shende achieve brilliant success in Robotex India National Championship

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) २५ सप्टेंबर २०२५ - रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्राशी संबंधित 'रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप'मध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले आहे.

    प्रशालेचे विद्यार्थी देवेंद्र महेश सुतार आणि शिवराज शेंडे यांनी 'फोक रेस - इंटरमीडिएट' प्रकारात राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

    पुण्यातील एमआयटी, लोणी काळभोर येथे दि. २० आणि २१ सप्टेंबर रोजी या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील २००० पेक्षा जास्त संघ आणि ५००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झालेल्या या स्पर्धेत फलटणच्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे.

    या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, रोबोटिक्स शिक्षक आकाश साळुंखे आणि अनिकेत माने यांचेही कौतुक केले.

No comments