Breaking News

फलटण तालुक्यातील १३ कि.मी. रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा मिळाला - मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर

13 km of roads in Phaltan taluka got the status of rural roads - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ सप्टेंबर २०२५ - ग्रामीण विकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून फलटण तालुक्यातील १३ कि.मी लांबीचे ०५ अवगीकृत/ योजनाबाहय रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजनेअंतर्गत दर्जा मिळाला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील रस्ते हे अतिशय चांगले दर्जेदार  होणार आहेत अशी माहिती  माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    यामध्ये १) राजळे गाव फलटण आसु रस्ता 26 चारी  टेंगील वस्ती ते अनपट वस्ती रस्ता २ कि.मी २) राजाळे गाव अंतर्गत आसु  रोड ते पिंपरद रस्ता ४ कि.मी. ३) राजळे जाधव वस्ती ( शिवाजी नगर ) ते सोनगाव रस्ता १ कि.मी ४)आळजापुर ते पवार वस्ती मसुगडे वस्ती ते रणदिवे वस्ती ३.५० कि.मी ५) आळजापुर  ते शिंदे वस्ती ( धनगरवाडा)  बिबी रस्ता २.५० कि मी हे रस्ते ग्रामीण मार्ग झाल्यामुळे फलटण तालुक्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे.

    या पाठपुराव्यामध्ये आमदार सचिन पाटील , माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, विलासराव नलवडे यांनी पाठपुरावा केला आहे.. त्यामुळे फलटण तालुक्यातील रस्त्यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील त्यामुळे फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने ना.  जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments