स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात किमोथेरपी सेंटर सुरु
सातारा दि.24 : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील बंद झालेल्या किमोथेरपी सेंटरची आरोग्य विभागशी पाठपुरावा करुन पुन्हा नव्याने सुरु करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.
किमो थेरपी सेंटरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) डॉ. सुभाष कदम डॉ. अरुंधती कदम, डॉ. उल्का झेंडे, डॉ. संजीवनी शिंदे, डॉ. प्रमा गांधी उपस्थित होते.
जे रुग्ण किमोथेरपीवर आहेत, अशा रुग्णांनी आपले सर्व रिपोर्ट व किमोथेरपीबाबतचे कागदपत्रे घेऊन या रुग्णालयातील एनसीडी विभागाशी संपर्क साधावा व या उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. करपे यांनी उद्घाटना प्रसंगी केले.
No comments