शेतकऱ्याच्या बेड्या तोडून गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करा - सदाभाऊ खोत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० सप्टेंबर २०२५ - गोवंश हत्या बंदी कायदा म्हणजे कँसर आहे. गोरक्षक बिना भांडवली धंदा आहे. गोशाळा जनावरांसाठी तुरुंग झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्याच्या बेड्या तोडून टाका व गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करा अशी आग्रही मागणी करत स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निर्यातबंदी न करता बाहेरील शेतीमाल आयात करु नयेत, दूध चाळीस रुपये लिटर तर ऊस 4000 रुपये प्रति टन दरवाढ करण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज फलटण येथे केली.
गोवंश हत्या बंदी कायद्यात बदल करण्यासाठी तसेच दूध व ऊस दरवाढ यासह शेतकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी फलटण येथील तहासिल कार्यालयावर रयत क्रांती संघटनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला, याप्रसंगी माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत हे बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, जेष्ठ प्रवक्ते खंडू करचे, तालुकाध्यक्ष अभिमन्यू ठोपरे, खंडेराव सरक व इतर मान्यवर उपस्थित होते.
जीएसटी कमी करुन उद्योग क्षेत्राला आधार दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून, पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दूध उत्पादक शेतकयांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोटे वाचवायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे. या कायद्याच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकयांच्या गोठ्यामधील गाभन न राहणाऱ्या गाई म्हशी वयस्कर गाई विविध कारण मुळे दूध न देणाऱ्या गाई अशा गाईंचे संगोपन करणं, तसेच ज्या जर्सी होस्टन गाई व्यायल्यानंतर ज्यांना खोंड होत आहेत, अशा खोडांचा गंभीर प्रश्न, दूध धंद्यातील दराच्या चढ-उतारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे, यामुळे जर्सी गाईंच्या गोठ्यांचे मालकांना दूध व्यवसायाच्या अनुषंगाने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. गोहत्या बंदी कायद्यात जर्सी होस्टन गाई, जर्सी बैल, म्हशी, रेडे हे वगळण्यात यावे सरकारने शेतकर्यांचा गोठा वाचवावा असे आवाहन खोत यांनी केले.
यावेळी शेखर खरात, हेमंत सुतार, प्रसाद अनपट, सुधीर शिरसागर, दादा गोफणे , चेतन चव्हाण, संतोष जावळकर , राजेश खराडे, निलेश सोनवलकर , दीपक सस्ते , संतोष शेडगे , सागर डोईफोडे, साई शिदे, पांडुरंग गायकवाड , योगेश संकपाळ, विशाल संकपाळ, तुकाराम गावडे अमर गावडे , सागर सोनवलकर, अलंकार भोईटे, भरत नांगरे , प्रवीण कदम , बाळू शिंदे, रामदास सोनवलकर , नवनाथ कुंडलकर , त्रिंबकराव डोंबाळे , दीपक डोंबाळे , अक्षय झणझणे, दिलीप शिपकुले, बाळू शिपकुले, सतिश शिपकुले, संदीप ढोपरे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments