Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणची दि.२९ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

Annual General Meeting of Agricultural Produce Market Committee, Phaltan on 29th

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ सप्टेंबर २०२५ - कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यालयात समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

    फलटण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत सरपंच, विकास सोसायटी चेअरमन किंवा त्यांचे प्रतिनिधी, भुसार, कांदा आणि फळे भाजीपाला अडते असोसिएशन, कामगार युनियन प्रतिनिधी, खरेदीदार, हमाल, मापाडी यांनी कामकाजात सहभाग घेण्यासाठी या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.

    या सभेत मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, २०२४ -२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद व उत्पन्न खर्च पत्रकांची नोंद घेणे, २०२५ - २६ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाची नोंद घेणे, २०२३- २४ या वर्षातील शासकीय वैधानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे आणि सभाध्यक्षांच्या अनुमतीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे असे विषयपत्रिकेवरील विषय असल्याचे सांगून बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीच्या-वतीने करण्यात आले आहे.

No comments