लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ; 1500 रुपये खात्यात जमा होणार
गंधवार्ता वृत्तसेवा, दि.३ ऑगस्ट २०२५ - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी १५०० रुपये वितरित करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस म्हणजे दि 8 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.
No comments