कुरवली वृद्धाश्रमात सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनतर्फे योग शिबिर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ जुलै २०२५ - कुरवली येथील वृद्धाश्रमात सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशनच्या वतीने एक तासाचे भव्य योग साधना शिबिर आयोजित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या प्रोटोकॉलनुसार आयोजित या शिबिरात सुमारे 50 साधकांनी सहभाग घेत योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला.
फाउंडेशनच्या अध्यक्षा शबाना पठाण यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले, "21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 पासून जगभर साजरा केला जातो. योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन साधणारी जीवनशैली आहे. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन शांत राहते आणि आत्मविश्वासाला चालना मिळते. या दिवशी आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात योगाला स्थान देण्याचा संकल्प करावा.
मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य येवले सर म्हणाले, "सुवर्ण परीस स्पर्श फाउंडेशन समाजोपयोगी उपक्रमांद्वारे नेहमीच गरजूंपर्यंत पोहोचते. वृद्धाश्रमात योग शिबिराचे आयोजन करून फाउंडेशनने खऱ्या अर्थाने समाजसेवेचे उदाहरण घालून दिले आहे.
"योग प्रशिक्षिका मयूरी शेवते यांनी वृद्धांसाठी सोप्या योगासनांचे प्रात्यक्षिक करवून घेतले, ज्यामुळे सर्वांना आनंददायी अनुभव मिळाला.
यावेळी मंगलताई जाधव यांनी योगाचे भारतीय परंपरेतील महत्त्व विशद करत फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
वृद्धाश्रमातर्फे जोशी काका यांनी सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमास येवले सर, गांधी सर, मयूरी शेवते, शीतल भोसले, जयश्री आढाव, सायली पाठक, रजिया शेख, मंगल जाधव, ट्रेनर इनामदार मॅडम, शबाना पठाण आणि फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
No comments