निरगुडी येथे उद्यानकन्यांचा वृक्षारोपण सोहळा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ जुलै २०२५ - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रा.उ. का. का. 2025-26 आयोजित येथील उदयानकन्या कु. तांबोळी बुशरा , कु. वाघ अनुराधा, कु. कारंडे शिवांजली, कु. निकाळजे संजना, कु. शिंदे साक्षी यांनी निरगुडीमध्ये वृक्षारोपण सोहळा आयोजित केला. याप्रसंगी सरपंच सौ. कोमल सस्ते, सहाय्यक कृषी अधिकारी संजय गायकवाड आदि उपस्थित होते.
कार्यक्रम सोहळ्याच्या अध्यक्षा सरपंच सौ .कोमल सस्ते यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण करून, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर सौ. कोमल सस्ते यांनी उद्यानकन्या व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपत्र झाला असे जाहिर केले. या सर्व उद्यानकन्यांना उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण चे मा. प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे. व्ही. लेंभे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ए. आर. पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments