Breaking News

मुधोजी हायस्कूल फलटण येथे एअर जी इनोव्हेशन एआय लॅबचा शुभारंभ

Air G Innovation AI Lab inaugurated at Mudhoji High School Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ जुलै २०२५ - मुधोजी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे एअर जी इनोव्हेशन ए आय लॅबचा शुभारंभ दि.३० जून २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी  प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर, शिवाजीराव घोरपडे, भोजराज नाईक निंबाळकर, संजय भोसले, कुंडलिक नाळे, चंद्रकांत पाटील,  शिरीषशेठ दोशी, रणजीत निंबाळकर, प्राचार्य वसंतराव शेडगे सर, उप प्राचार्य सोमनाथ माने सर,विशाल शिंदे सर तसेच एअर जी इंटरनॅशनलचे प्रताप पवार सर, राजेंद्र खवळे सर, सुयश पाटील व  साक्षी गुप्ता उपस्थित होत्या.

    विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची दारे उघडणाऱ्या या लॅबमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला असल्याचे मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

    एअर जी इनोव्हेशनचे महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खवळे सर यावेळी म्हणाले की, "या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ए आय (कृत्रिम बुद्धिमत्ता), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कोडींग व प्रोग्रामिंग यासारखे अत्याधुनिक टेक्निकल एज्युकेशन मिळणार आहे. हे शिक्षण प्रकल्प आधारित पद्धतीने दिले जाईल जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनाशीलता आणि संशोधनाची रुची विकसित होईल."

    तसेच त्यांनी यावेळी सांगितले की, " श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच सिद्धनाथ हायस्कूल, म्हसवड येथे देखील एअर जी इनोव्हेशन एआय लॅब  सुरू करण्यात येणार आहे,

    या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

No comments