Breaking News

वृक्ष लावा, प्लॅस्टिक टाळा ; पालखी सोहळ्यात हिरकणीचा हरित संदेश

Plant trees, avoid plastic; Hirkani's green message at Palkhi ceremony

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ जून २०२५ - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळा 2025 च्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेकडून विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व आरोग्यदायी उपक्रम राबवण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवण्यात आले.

    यंदाच्या वारीमध्ये महिला वारकरी व भाविकांसाठी विशेषतः 'हिरकणी कक्षा' ची व्यवस्था करण्यात आली होती. या कक्षामध्ये महिला भक्तांसाठी विश्रांती, सुरक्षितता व आवश्यक सुविधा सुसज्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या.

    याचबरोबर, पर्यावरण संवर्धनासाठी 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत भाविकांना रोपांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून वारीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. भाविकांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.

    सिंगल युज प्लास्टिक बंदीचा संदेश पोहोचवण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच, आरोग्य जनजागृतीचा भाग म्हणून मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरून कोरोना किंवा इतर संसर्गजन्य आजारांपासून बचाव होऊ शकेल.

    फलटण नगरपरिषदेचे हे उपक्रम सामाजिक जाणीव, पर्यावरण संरक्षण व आरोग्य संवर्धनाचा उत्कृष्ट संगम ठरले असून, भाविकांमध्ये समाधान व सकारात्मक प्रतिसाद उमटवणारे ठरले आहेत.

No comments