Breaking News

ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव सरांच्या निधनाने पत्रकार व सामाजिक क्षेत्रात मोठी हानी : शोकसभेत अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

The death of senior journalist Prof. Ramesh Adhav Sir is a great loss to the journalistic and social sectors: Many dignitaries paid tribute at the condolence meeting

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ जुलै २०२५  -  धाडसी व निर्भीड  ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांच्या अचानक निधनाने निर्माण झालेली पोकळी येणारा काळच भरून काढू शकतो. आढाव कुटुंबीयांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे गरजेचे असून, त्यांच्या निधनाने पत्रकार व सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाली असल्याची संयुक्तिक भावना, जेष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांच्या निधनानंतर आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये मान्यवरांनी संयुक्तिक भावना व्यक्त केली.

    या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर,  जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी सभापती रामभाऊ ढेकळे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत भैय्या नाईक निंबाळकर, जेष्ठ साहित्यिक तानाजीराव जगताप, प्राचार्य सुधीर इंगळे, प्राचार्य रवींद्र येवले, दादासाहेब चोरमले,  शिवसेना तालुकाप्रमुख नानासो तथा पिंटू इवरे, डॉ. जे. टी. पोळ, डॉ. बी.आर. आंबेडकर आय आय टीचे शेखर कांबळे, प्रा.रवींद्र कोकरे, प्रा. सतीश जंगम, स. रा. मोहिते,  सचिन मोरे कामगार संघर्ष संघटनेचे सनी काकडे, प्रदीप झणझणे,श्रीमती कांताबाई काकडे,भाजपा तालूका प्रमुख अमित रणवरे, सौ. सुपर्णा सनी अहिवळे आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

    तत्पूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी आढाव कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

    सौ. मनीषा कांबळे, ओबीसी नेते बापूराव काशीद,संजय देशमुख, ह. भ. प. नवनाथ कोलवडकर, मंगेश आवळे,  यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील कला,क्रीडा,शैक्षणिक, सामाजिक,राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

    प्रारंभी दिवंगत प्राध्यापक रमेश आढाव यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यामध्ये दिवंगत प्राध्यापक रमेश आढाव यांच्या पत्नी श्रीमती वंदना आढाव, त्यांचे चिरंजीव ऋषिकेश आढाव, सून सौ. उन्नती आढाव विवाहित मुलगी सौ,  तेजस्विनी काकडे, जावई मनोज काकडे, जेष्ठ बंधू विलास आढाव यांच्या सह उपस्थितांनी आदरांजली वाहिली. फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांच्या शोक सभेचे आयोजन फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.

No comments