संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर रविवारी फलटण येथे मुक्काम
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony on the way back, stopover at Phaltan on Sunday
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)दि.१० जुलै २०२५ - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गावर रविवार, दि. १३ जुलै रोजी सायंकाळी नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, रविवार पेठ, फलटण येथे मुक्कामी येणार असून भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी केले आहे. नेहमी आषाढ वद्य चतुर्थीस फलटण मुक्कामी येणारा सोहळा या वर्षी एक दिवस अगोदर आषाढ वद्य तृतीयेस फलटण मुक्कामी येत असल्याचे हेंद्रे यांनी सांगितले.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी दि. १९ जून रोजी आळंदीहून प्रस्थान ठेवले. पंढरपूर येथे आषाढी एकादशी नंतर परतीच्या वाटेवर सोहळा गुरुवार, दि. १० जुलै रोजी पंढरपूर येथून आळंदीकडे मार्गस्थ झाला असून, शुक्रवार, दि. ११ रोजी वेळापूर मुक्काम, शनिवार, दि. १२ रोजी नातेपुते मुक्काम करणार आहे. रविवार, दि. १३ जुलै रोजी धर्मपुरी व साधुबुवा ओढा येथे सकाळचा विसावा, बरड, पिंप्रद, विडणी येथे दुपारचा विसावा आणि रात्री नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर, फलटण येथे मुक्काम आहे. सोमवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी निंभोरे ओढा, सुरवडी, दत्त मंदिर, काळज येथे विसावा, तरडगाव येथे दुपारचा विसावा आणि लोणंद पूल फाटा येथून सोहळा रात्री पाडेगाव मुक्कामी थांबणार आहे. मंगळवार, दि. १५ जुलै रोजी वाल्हे, बुधवार, दि. १६ जुलै रोजी सासवड, गुरुवार, दि. १७ जुलै रोजी हडपसर, शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी भवानी पेठ, पुणे, शनिवार, दि. १९ जुलै रोजी पुणे, रविवार, दि. २० जुलै रोजी आळंदी आणि सोमवार, दि. २१ जुलै रोजी सोहळा संत शिरोमणी ज्ञानेश्वर मंदिर येथे मक्कामी पोहोचणार आहे.
No comments